सातारा औद्यागिक विकास महामंडळाचा विकास थांबवणार्‍यांवर कारवाई करा !

कारवाई करण्याच्या आदेशाचे पालन केले कि नाही, याचाही पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !

भाजपपुरस्कृत सदाभाऊ खोत यांची माघार !

विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपने अपक्ष म्हणून पुरस्कृत केलेले उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या ! – काँग्रेस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (निर्माणाधीन) प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या संदर्भातील एक ठराव काँग्रेसच्या ‘ओबीसी मंथन शिबिरा’त संमत करण्यात आला आहे.

पुणे येथील भंगारमालाच्या व्यवसायिकाच्या दुकानातून १ सहस्र १०० काडतुसे आणि ‘बुलेट लिड’चा साठा जप्त !

न्यायालयाने संशयित आरोपीस १५ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. असुरक्षित पुणे ! काडतुसे बाळगणार्‍या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

संभाजीनगर येथे १ लाख २५ सहस्र अवैध नळजोडण्या !

इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध नळजोडण्या होतातच कशा ? प्रशासनाच्या हे वेळीच लक्षात कसे येत नाही ?

अंगणवाडीचे डिजिटल वीजदेयक भरण्याविषयी अनिश्चिती !

गावे महापालिकेत हस्तांतरण करतांना पूर्ण नियोजन करूनच नंतर करायला हवी. उतावळेपणाने केलेल्या कारभाराची ही फळे आहेत. मतांसाठी केलेला हा कारभार आहे, असे जनतेला वाटल्यास त्यामध्ये चूक काय ?

कु. स्वरूप दिलीप पाटील याला १२ वीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण !

आपल्या यशाविषयी कु. स्वरूप म्हणाला, ‘‘अभ्यास करतांना नियमित खोलीची शद्धी करून प्रार्थना करून अभ्यासास प्रारंभ करत असे.

सातारा नगरपालिकेची ४.५ कोटी रुपयांची देयके थकित !

कोट्यवधी रुपयांची देयके थकित का राहिली ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. देयके वसूल करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

हडपसर (पुणे) येथे महिलांच्या स्नेह मेळाव्यात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ प्रवचनाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद !

या कार्यक्रमात महिलांना साधनाविषयक मार्गदर्शन मिळावे यासाठी श्री. रवींद्र घुले, सौ. मंगल घुले, सौ. दीपमाला घुले यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले.