नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (निर्माणाधीन) प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या संदर्भातील एक ठराव काँग्रेसच्या ‘ओबीसी मंथन शिबिरा’त संमत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठराव मांडणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोमध्ये संमत झाला आहे. त्याला येथील प्रकल्पग्रस्त संघटना आणि भाजप यांनी विरोध करत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसने यापूर्वी ‘बाळासाहेब ठाकरे’ यांच्या नावाला सहमती दिली होती; मात्र आता दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे.