२३ जणांवर गुन्हे नोंद !
संभाजीनगर – गेल्या काही दिवसांत महापालिकेने केलेल्या निरीक्षणानुसार शहरात १ लाख २५ सहस्र अवैध नळजोडण्या झाल्या आहेत. अन्य ठिकाणीही झालेल्या नळजोडण्यांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेने ८ दिवसांची मुदतवाढ घेतली आहे. यानंतर अवैध नळ घेणार्यांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील एका भागात २३ अनधिकृत नळजोडण्या खंडित करून संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाइतक्या मोठ्या प्रमाणात अवैध नळजोडण्या होतातच कशा ? प्रशासनाच्या हे वेळीच लक्षात कसे येत नाही ? |