सातारा औद्यागिक विकास महामंडळाचा विकास थांबवणार्‍यांवर कारवाई करा !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा, १३ जून (वार्ता.) – येथील औद्यागिक विकास महामंडळाचा विकास टक्केवारीसाठी थांबवणार्‍या खंडणीखोर गुंडांना पाठीशी घालणार्‍या लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्हा दौर्‍यावर होते. अजित पवार यांना एक क्लिप पहायला मिळाली. ही क्लिप जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पवार यांनी दाखवली.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींच्या नावावर कुणी चुकीचे काम करत असेल, तर ते खपवून घेऊ नका. लोकप्रतिनिधींनी नीट कामे केली, तर विकास होतो. ठेकेदाराला अडचण असेल, तर साहाय्य करायचे असते. पुण्यात रांजणगाव, इंदापूर, बारामती, सणसवाडी, जेजुरी, तळेगाव, चाकण, सासवड आदी ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळे आहेत. औद्योगिक विकासात अडथळा आणला, तर अडथळा आणणारा आमच्या जवळचा आहे कि, लांबचा आहे, हे आम्ही पहात बसत नाही.’’

संपादकीय भूमिका

  • कारवाई करण्याच्या आदेशाचे पालन केले कि नाही, याचाही पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !