पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांच्या शोधासाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’मध्ये गुरुवार पेठेतील गौरी आळी येथे भंगारमाल व्यावसायिकाकडे दीड लाख रुपये मूल्याची ५६ जिवंत काडतुसे, ७९ खराब काडतुसे, ९७० बुलेट लिड, असा एकूण १ सहस्र १०० हून अधिक बंदुकीच्या गोळ्यांचा साठा सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार दिनेशकुमार सरोज याला अटक केली आहे. न्यायालयाने संशयित आरोपीस १५ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याने ही काडतुसे आणि बुलेट कुठून आणली, त्याने ती कोणत्या कारणासाठी जवळ बाळगली होती ? यापूर्वी त्याने इतर कुणाला शस्त्र अन् गोळ्या यांचा साठा पुरवला होता का ? याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अन्वेषण केले जात आहे. यावर आरोपीने या गोळ्या त्याच्या पूर्वीच्या मालकानेच ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तरीही पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण सर्व बाजूंनी करत आहेत.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित पुणे ! काडतुसे बाळगणार्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! |