कु. स्वरूप दिलीप पाटील याला १२ वीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण !

कु. स्वरूप पाटील

कोल्हापूर, १३ जून (वार्ता.) – येथील  सनातनचा साधक कु. स्वरूप दिलीप पाटील याला १२ वीच्या परीक्षेत ८१.३३ टक्के (६०० पैकी ४८८ गुण) गुण मिळाले आहेत. आपल्या यशाविषयी कु. स्वरूप म्हणाला, ‘‘अभ्यास करतांना नियमित खोलीची शद्धी करून प्रार्थना करून अभ्यासास प्रारंभ करत असे. परीक्षेसाठी जातांना नियमितणे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना वंदन करून जाणे आणि आल्यावर कृतज्ञता व्यक्त केली. महाशिवरात्रीला ग्रंथप्रदर्शनाच्या कक्षावर सेवा केली, तसेच प्रासंगिक सेवेतही माझा सहभाग असतो.’’