नूपुर शर्मा यांनी ठाणे पोलिसांकडे मागितली ४ आठवड्यांची मुदत
पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी नूपुर शर्मा यांना भिवंडी पोलिसांनी समन्स बजावले होते. यावर नूपुर शर्मा यांनी पोलिसांकडे आणखी ४ आठवड्यांची मुदत मागितली आहे.
राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा ! – नाना पटोले
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचा पाठिंबा असणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. १८ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.
परकियांच्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
प्राचीन काळापासून ‘काशी ही मोक्षनगरी आहे’, असे हिंदु धर्मशास्त्रात वर्णिले आहे. त्यामुळे काशीच्या पवित्र भूमीवर औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याने केलेल्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक आहे.
स्वत:मध्ये अंतर्गत परिवर्तन करणे म्हणजे खर्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती
व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपण शिकवणी घेऊन स्वतःत पालट करतो. समाजात आपण चांगले दिसावे, यासाठी प्रयत्न करतो; परंतु मातृभूमीच्या रक्षणासाठी सिद्ध होणार्या प्रत्येक युवक-युवतीने स्वतःमध्ये अंतर्गत परिवर्तन करणे हाच खर्या अर्थान व्यक्तिमत्त्व विकास आहे..
‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’च्या वतीने पिंपळपौर्णिमा साजरी !
धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम ! साधनेमुळे प्रारब्ध अल्प होऊन जीवनातील कठीण प्रसंगाला सामोरे जाणे सुसह्य होते. आतातरी सरकार हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करेल का ?
सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस हा विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न ! – संजय राऊत, खासदार
केंद्रीय पडताळणी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा छळ चालू आहे. हे देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही यांना खड्ड्यात घालण्याचे काम करत असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
पुणे येथील भवानी पेठेत एका धर्मांधाच्या घरी स्फोट !
देशाचे पंतप्रधान शहरात येण्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटना उघडकीस येणे, हा आतंकवाद भारतातून समूळ नष्ट करत नसल्याचा परिणाम !
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत केवळ १५.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक !
खडकवासला धरणातून सध्या दौंड आणि इंदापूर या तालुक्यांना १७ जूनपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर चारही धरणांतील उर्वरित पाणीसाठा पुणे शहर परिसराला पिण्यासाठी आरक्षित आहे.
बाल आणि किशोरवयीन कामगारांना कामास ठेवू नये ! – साहाय्यक कामगार आयुक्त, सातारा
सातारा जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने, हॉटेल, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज आणि इतर ठिकाणी बाल अन् किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये. असे केल्यास हा कायद्याने गुन्हा ठरेल, अशी माहिती साहाय्यक कामगार आयुक्त रे.मु. भोसले यांनी दिली.