विधान परिषद निवडणूक

मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपने अपक्ष म्हणून पुरस्कृत केलेले उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याने आम्ही ५ जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती; परंतु काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने निवडणूक होत आहे. आमची पाचवी जागा निवडून येईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ६ वी जागा लढणे शक्य नसल्याने सदाभाऊ खोत यांनी अर्ज परत घेतल्याचे सांगितले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
संपादकीय : मनसुबे उघड !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !