अभिनेत्री केतकी चितळे यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी !
शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे प्रकरण
शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे प्रकरण
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना १४ मे या दिवशी उघडकीस आली. रामजी तिम्मा (वय ४० वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
‘तुम्हाला पुण्यात रहायचे असेल तर आमचे नेते आणि पक्ष यांविषयी काहीही बोलायचे नाही. तुम्हाला योग्य ती जागा दाखवू. माजला आहात. माफी मागितली म्हणून उपकार केलेत का ?’, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली.
मनसेच्या जनहित आणि विधी विभागाचे सरचिटणीस अधिवक्ता किशोर शिंदे यांनी भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना अधिवक्त्यांनी केलेल्या सहकार्याची माहिती या वेळी दिली.
विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय यांचा उत्स्फूर्त सहभाग
आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही, केवळ पवार असा उल्लेख आल्याचे तिने म्हटले आहे….
भगवे ध्वज, दुमदुमणाऱ्या घोषणा अन् दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांच्या मनातील गुरूंविषयीचा अपार कृतज्ञताभाव यांमुळे वातावरण हिंदु नवचैतन्याने भारित झाल्याचे उपस्थितांनी अनुभवले.
जी अमेरिका स्वत:च्या देशातील वांशिक हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवू शकत नाही, तिला म्हणे भारताची चिंता ! त्यामुळे अमेरिकेने इतर देशांत नाक खुपसण्याऐवजी स्वत:चीच देशांतर्गत स्थिती सुधारण्याकडे लक्ष देणे तिच्यासाठी हितावह आहे !
‘भारतात आतंकवादी कृत्य केल्यास जन्माची अद्दल घडेल’, अशा शिक्षेची तरतूद केल्यासच त्यांच्यात भय निर्माण होऊ शकते. यासाठी पाकवर सैनिकी कारवाई करण्याचे आणि आतंकवाद्यांना साहाय्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे पाऊल सरकारने तात्काळ उचलावे, ही अपेक्षा !
खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर चाप बसावा, यासाठी राज्य सरकारने कोविडकाळात उपचारांचे दर निश्चित केले आणि सर्व रुग्णालयांना सरकारी आदेशाचे पालन बंधनकारक केले; मात्र असे असूनही काही रुग्णालयांनी रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केले. अशा तक्रारी केल्यानंतरही सरकारने त्यांच्यावर अंकुश लावायला हवा होता.