कल्याणमध्ये कपड्यांच्या दुकानांतून ३२ सहस्र रुपयांच्या कपड्यांची चोरी !

अशांना पकडून लवकरात लवकर कठोर शिक्षा करणे अपेक्षित !

रस्त्यांची कामे नीट न केल्यास कारागृहात जाण्याची सिद्धता ठेवा !

गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची अशी बैठक घेऊन आयुक्तांना असे सांगावे लागते, हे लज्जास्पद आहे. खरेतर चांगल्या दर्जांचे रस्ते न करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या सूचीत टाकून त्यांना कायमस्वरूपी ठेका न देण्याचे धोरण महापालिकेने राबवले पाहिजे.

लोणावळा (पुणे) येथे पोलीस निरीक्षकासह दोघांवर लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

लाचखोरी करणारे पोलीस कधी कायदा-सुव्यवस्था राखू शकतील का ?

संभाजीनगर येथे मनसेची ‘पाणी संघर्ष यात्रा’ चालू, कार्यकर्त्यांच्या हाती रिकामे हंडे !

कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच अत्यंत विलंबाने होत असलेल्या पाणी समस्येवर महापालिका आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यावर ताशेरे ओढले. शहरातील ५५ प्रभागांतून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलते करणार आहेत.

भंडारा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेची हत्या !

समाजातील लोकांना धर्मशिक्षण देऊन अंधश्रद्धा दूर झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

संपूर्ण देशातच अशी कारवाई करावी !

‘माझ्याकडे कर्नाटक राज्यातील अवैध चर्च यांची माहिती आहे. मी सरकारला विनंती करीन की, अशी अवैध चर्च पाडून टाकण्यात यावीत’, अशी मागणी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णाकक्षात प्रसाद बनवण्यासाठीचा पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे ‘अग्नि’ ! अग्निदेवाप्रती कृतज्ञताभाव कसा असला पाहिजे. आज मी अन्नपूर्णा कक्षातीलच महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या प्रसाद (स्वयंपाक) बनवण्यासाठी उपयोगात आणणाऱ्या भांड्यांविषयीचे विवेचन या लेखाद्वारे करणार आहे.

इन्क्विझिशनमुळे गोव्याच्या संस्कृतीचा झालेला नाश

गोव्याचा विचार करतांना, तो केवळ संस्कृतीचा ऱ्हास नव्हता, तर ती पूर्णतः सांस्कृतिक दिवाळखोरी होती, असेच म्हणावे लागेल. पोर्तुगिजांनी आमच्या राष्ट्रीय संस्कृतीच्या प्रगतीत बाधा तर आणलीच; पण तिच्या जागी उल्लेखनीय अशी नवी संस्कृती आणण्यासही ते लायक नव्हते, हेच सिद्ध केले.

‘ताजमहाल’ नव्हे, तर ‘तेजोमहाल’ नावाचे शिवमंदिर

नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

राजद्रोहाच्या कलमाविषयी केंद्रशासन आणि सर्वाेच्च न्यायालय यांची भूमिका !

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजद्रोहाच्या कलमाखालील सर्व गुन्हे आणि खटले आता स्थगित करण्यात आलेले आहेत. या कलमासह अन्य कलमे असतील, तसेच खटला चालवल्यास आरोपीस कोणतीही हानी होणार नसेल, तर संबंधित न्यायालय असे खटले चालवण्याविषयी निर्णय घेतील.