विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित !

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. जुलै मासात १० जागा रिक्त होणार असून यासाठी २० जून या दिवशी मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.

माफीचा साक्षीदार बनण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अर्ज !

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्या अर्जाला सशर्त संमती दिली आहे.

खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पुणे येथील ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या अध्यक्षांसह चौघांवर गुन्हे नोंद !

भ्रष्ट कारभार करणारे अधिकारी विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?

अमरावती येथे मांत्रिक अब्दुल रहीम याच्या अघोरी उपचारांमुळे तरुणाचा संशयास्पद मृत्यू !

मांत्रिक हा मुसलमान असल्याने त्याच्या विरोधात संपूर्ण पुरो(अधो)गामी टोळी मौन बाळगून आहे, हे लक्षात घ्या !

कोकण किनारपट्टीवर ३१ ऑगस्टपर्यंत जलक्रीडा व्यवसायाला बंदी

कोकण समुद्र किनारपट्टीवर २५ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने दिला आहे. त्यामुळे आता पर्यटन हंगामात जलक्रीडा प्रकारांना आळा बसणार आहे.

क्षात्र आणि ब्राह्म तेजाचा हुंकार देणारी सातारा येथील भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ !

पुरोगाम्यांना चपराक देत १ सहस्र ५०० हून अधिक धर्माभिमान्यांचा दिंडीत सहभाग ! दिंडीचा प्रारंभ शंखनादाने झाला. दिंडी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि सातारा शहराचे ग्रामदैवत श्री ढोल्या गणपति यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांच्याकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट !

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

अकोला येथे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिकवणी वर्गचालक वसीम याला अटक

तक्रारीनुसार वसीम चौधरी याने पीडित मुलीशी भ्रमणभाषवरून अश्लील संभाषण करणे आणि तिला खोलीवर बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करणे, असे आरोप आहेत. स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

‘रक्तरंजित’ अमेरिकी राज्यघटना !

भारताला नेहमी मानवाधिकारांचे डोस पाजणारी अमेरिका स्वत:च्या नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी काही करत नाही. ‘सर्वांत सामर्थ्यवान अमेरिकेची राज्यघटनाच रक्तरंजित असून भारताने तिला आरसा दाखवावा’, असेच गोळीबाराच्या या घटनांवरून भारतियांना वाटते !

अतिक्रमण, अनधिकृत वाहतूक यांमुळे पुणे शहरातून वहाणाऱ्या मुठा उजवा कालव्याला गळती !

प्रशासन अतिक्रमणे हटवत का नाही ? कालव्याची गळती जनतेच्या जिवावर बेतणारी आहे, हे लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना काढणे आवश्यक आहे.