अकोला येथे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिकवणी वर्गचालक वसीम याला अटक

अकोला – येथील अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी शहरातील तोषणीवाल लेआऊट येथील शिकवणीवर्ग चालक वसीम चौधरी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३५४ सह ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौधरी याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. २२ मे या दिवशी सायंकाळी पीडित मुलीने वसीम याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

या तक्रारीनुसार वसीम चौधरी याने पीडित मुलीशी भ्रमणभाषवरून अश्लील संभाषण करणे आणि तिला खोलीवर बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करणे, असे आरोप आहेत. घाबरलेल्या मुलीने ही गोष्ट पालकांना सांगून त्याच्या विरोधात तक्रार दिली. या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !