मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणारच ! – दिलीप दातीर, नाशिक शहराध्यक्ष, मनसे

मशिदींवरील भोंग्यावरून अजान दिली जात असल्याने राज ठाकरे यांनी भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतची समयमर्यादा दिली आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू !

सर्वाेच्च न्यायालयाने एस्.टी. कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू झाल्या आहेत. आगारातील ६५८ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये ‘ई-मेल’चा पर्याय उपलब्ध करावा ! – अधिवक्ता धनंजय चव्हाण

सध्याच्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये टपालाने (पोस्टाने) तक्रारी पाठवण्यासह नागरिकांना ‘ई-मेल’ने तक्रार पाठवण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सातारा येथील अधिवक्ता धनंजय चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील सभेला ५ हून अधिक संघटनांचा विरोध !

मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल, वंचित बहुजन आघाडी, मौलाना आझाद विचार मंच, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर ॲक्शन संघटना. या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ‘राज ठाकरे यांच्या सभेमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो.

पोलीस आणि इफ्तार पार्टी !

आतापर्यंत काही ठराविक दंगली सोडल्या, तर अन्य वेळी पोलिसांना दंगलखोर धर्मांधांना रोखण्यास पूर्ण अपयश मिळाले आहे. असे स्वाभिमानशून्य पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाहीत. कायद्याचे राज्य हवे असेल, तर पोलीस दलाच्या कार्यप्रणालीत अभूतपूर्व पालट करणे आवश्यक आहे.

उद्दाम धर्मांध !

भोंग्यांच्या संदर्भातील सूत्र ही चूक धर्मांधांची असतांना त्यांना ‘पीडित’ म्हणून आणि हिंदूंना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवण्याचे षड्यंत्र भारतातील काही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंडळी रचतांना दिसत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात धर्मांधांकडून हिंदूंवर आणखी आक्रमणे झाल्यास आणि त्याचे खापर हिंदूंवरच फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही.

नूतन संमेलनाध्यक्षांच्या समोरील आव्हाने !

संमेलन हे साहित्यजनांना न्याय देणारे, मराठीसाठी ठोस प्रयत्नशील असणारे, श्री सरस्वतीपूजनाची परंपरा परत चालू करण्याची संधी असलेले, असे होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. ९५ व्या संमेलनाध्यक्षांना ‘हे संमेलन किमान भाषिक उत्कर्षासाठी व्हावे’, यासाठीच झटावे लागेल !

वणी येथे शेतकर्‍यांच्या १ कोटी १५ लाखाचा अपहार करणार्‍या व्यापार्‍याला पोलिसांकडून अटक

अशा भ्रष्ट व्यापार्‍यांकडून त्यांची संपत्तीच शासनाधीन करायला हवी !

खराडी (पुणे) येथे ८ दुकानांना भीषण आग !

नगर रस्त्यावर खराडी जुना जकात नाका येथे रस्त्यावर असलेल्या जोगेश्वरी मिसळ आणि बाजूच्या फर्निचर ‘मोबाईल शॉपी’च्या दुकानाला ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागून आतापर्यंत ८ दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत.

असा इतिहास असणारी देशात सहस्रो ठिकाणे आहेत !

देहलीतील कुतूबमिनार येथील २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून तेथे सध्या असलेली ‘कुव्वत उल इस्लाम मशीद’ बांधण्यात आली, अशी माहिती प्रसिद्ध पुरातत्वतज्ञ के.के. महंमद यांनी दिली आहे.