ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ‘पॅन कार्ड’वरील जन्मदिनांक आणि शालेय शिक्षणातील जन्मदिनांक यात तफावत का ? – समरजितसिंह घाटगे, भाजप

ते म्हणाले, ‘‘मला जातीयवादी म्हणणारे हिंदूंची मते मिळवण्यासाठी वाढदिवसाला श्रीरामनवमीचा आधार घेऊन दिशाभूल करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच जातीयवादी आहेत.’’

कात्रज (पुणे) चौकातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार !

कात्रज परिसराचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन २५ वर्षे झाली, तरी मूलभूत सुविधा आणि विकास होत नाही. जाणीवपूर्वक डावलले जात असून नव्याने समाविष्ट ३४ गावांची तीच अवस्था आहे.

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक लावा ! – बाळा नांदगावकर, मनसे

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावा, असे ट्वीट  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ब्राह्मण समाजाची अपकीर्ती होत असतांना त्याला हसून दाद देणारे जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांचा निषेध ! – विश्वजित देशपांडे, अध्यक्ष, परशुराम सेवासंघ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची (पुरोहितांची) अपकीर्ती केली.

‘विजयदुर्ग’ आणि ‘लोकमान्य टिळकांचे स्मारक’ यांचे संवर्धन व्हावे ! 

अशी मागणी का करावी लागते ? खरे तर शासनानेच गड आणि स्मारके यांचे संवर्धन स्वत:हून करायला हवे ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका !

इंडियन बार असोसिएशनने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

पुढील सुनावणीपर्यंत नील सोमय्या यांना अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !

आय.एन्.एस्. निधी अपहार प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.

संभाजीनगर येथे भोंगे लावायचे असतील, तर कायदेशीर अनुमती घ्यावी ! – पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आदेश

पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता म्हणाले की, ध्वनीक्षेपकाच्या संदर्भात वर्ष २००५ मध्ये सर्वाेच्च न्यायालय आणि राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे, त्यानुसार अनुमतीविना ध्वनीक्षेपक लावता येत नाही.

८ सहस्र मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून तातडीने उपाययोजना करा ! – मुख्यमंत्री

राज्याची सध्याची वीजनिर्मिती, कोळशाचा साठा, विजेची आजची आणि भविष्यातील मागणी यांविषयी करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासमवेत बैठक झाली. 

तिरुपती देवस्थानाला नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यास भूखंड देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता !

यासह मुंबईतील बोरीवली येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रमाच्या धर्मादाय ट्रस्टसाठी भाडेतत्त्वाने देण्यात आलेली भूमीची मुदत ३० वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे.