मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणारच ! – दिलीप दातीर, नाशिक शहराध्यक्ष, मनसे

दिलीप दातीर

नाशिक – आम्हाला कारागृहात टाकायचे असेल, तर जरूर टाका. आम्ही आमचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेश पाळणारच. ३ मेपर्यंत भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावली जाईल, अशी चेतावणी येथील मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी १९ एप्रिल या दिवशी दिली आहे.

मशिदींवरील भोंग्यावरून अजान दिली जात असल्याने राज ठाकरे यांनी भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतची समयमर्यादा दिली आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील पोलीस आयुक्तांनी अनुमतीविना भोंगे वाजवण्यास सक्त मनाई केली असून विनाअनुमती भोंगे लावल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे; मात्र पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्याविषयी काढलेल्या आदेशाला मनसेने आव्हान दिले आहे.