माढा (जिल्हा सोलापूर) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी झाली आहे. साखर कारखान्यातील शेतकर्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे, उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, यांसह विविध विषयांवर ईडीकडून चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
ईडीच्या कारवाईमुळे माढ्यात खळबळ https://t.co/JoiVyckJhu
— News18Lokmat (@News18lokmat) April 3, 2022
आतापर्यंत पिता पुत्राची ३ वेळा चौकशी झाली आहे. संपूर्ण प्रकरणात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी ‘ईडी’कडे तक्रार केली होती. शेतकर्यांच्या कष्टाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार. वेळ प्रसंगी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवणार, असे माढा येथील शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी सांगितले.