कराड (जिल्हा सातारा) येथे ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन !

हिंदु जनजागृतीच्या वतीने उपस्थितांना ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ’

सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – येथील श्री दत्त चौकातील शिवतीर्थावर ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ’ दिली.

कार्यक्रमाला हिंदु एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष विनायक आण्णा पावसकर, सातारा जिल्हा उपाध्यक्ष रूपेश मुळे, जिल्हा समन्वयक अजय पावसकर, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड विभाग समन्वयक सागर आमले, सनातन संस्थेचे लक्ष्मण पवार, सुरेंद्र भस्मे आदी पदाधिकार्‍यांसह ३० हून अधिक धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते.