हलाल मांसावर बहिष्कार घालून ‘झटका’ मांस खरेदी करणार्‍या हिंदु समाजाचे अभिनंदन ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकातील ‘होसतोडकू’ सणाला हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणार्‍या हिंदु संघटनांच्या अभियानाला यश !

बेंगळुरू (कर्नाटक) – युगादीच्या (गुढीपाडवाच्या) दुसर्‍या दिवशी असलेल्या ‘होसतोडकू’ या सणाच्या दिवशी हिंदूंच्या देवतांना मांस अर्पण केले जाते. यापूर्वी देवतांना ‘हलाल’ मांस अर्पण करत होते. हिंदु जनजागृती समितीसह अनेक हिंदु संघटनांनी युगादीच्या (गुढीपाडवाच्या) दुसर्‍या दिवशी असलेल्या ‘होसतोडकू’ या सणाच्या दिवशी हलाल मांसावर बहिष्कार घालून झटका मांस खरेदी करण्याचे आवाहन हिंदूंना केले होते. त्याप्रमाणे हिंदु समाजाने होसतोडकू सणाच्या दिवशी हलाल मांसावर बहिष्कार घालून झटका मांसाची खरेदी केल्याचे अनेक जिल्ह्यांत लक्षात आले आहे. ‘हलालच्या माध्यमातून प्राण्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात येते. असे करणे हे ‘वर्ष १९६० च्या प्राणी हिंसाविरोधी कायद्या’च्या विरोधात आहे. हिंदु समाजात प्राण्यांची इतक्या अमानुषतेने हत्या करणे निषेधार्ह आहे. आमच्या मागणीला प्रतिसाद देऊन हलाल मांसावर बहिष्कार घालणार्‍या हिंदु समाजाचे अभिनंदन ! अशाच रीतीने पुढेही अन्य हलाल उत्पादनांवर आपण बहिष्कार घालूया’, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. यापुढे राज्य सरकारने हलालच्या नावाखाली चालणारी अमानुषता रोखण्यासाठी प्राण्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्याचा नियम कठोरपणे लागू करण्यात यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.

‘हलाल’ आणि ‘झटका’ मांस म्हणजे काय ?

हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याचे तोंड मक्केच्या दिशने करून त्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहाते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो. हिंदु, शीख आदी भारतीय धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्याची हत्या केली जाते. यामध्ये प्राण्याची मान एकाच घावामध्ये कापली जाते. यामुळे प्राण्याला अल्प प्रमाणात त्रास होतो.