देशातील सर्व टोल नाके हटवणार ! – नितीन गडकरी

टोल वसूल करण्यासाठी जी.पी.एस्. आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टम’ सिद्ध केली जात आहे. यात टोल नाका पार केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापली जाणार आहे.

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.

मारियूपोल (युक्रेन) येथे उद्याने, मैदाने आणि घरांचे अंगण येथे पुरले जात आहेत मृतदेह !

रशियाच्या आक्रमणात युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनच्या मारियूपोल शहरात मृतदेह स्मशानभूमीत नेणे कठीण झाल्यामुळे ते उद्याने, खेळाची मैदाने आणि घरांचे अंगण येथे पुरण्यात येत आहेत.

इम्रान खान यांच्या कार्यकाळात महागाईत ऐतिहासिक १५ टक्क्यांची वाढ !

पाकची आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल !

हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणार्‍या खात्यांवर ट्विटरकडून कारवाई का केली जात नाही ? – देहली उच्च न्यायालयाचा संतप्त प्रश्न

‘जर अन्य धर्मियांच्या भावनांसंदर्भात कुणी आक्षेपार्ह ट्वीट्स केले असते, तर तुम्ही अधिक गंभीर राहिला असता’, असेही न्यायालयाने ट्विटरला सुनावले. उच्च न्यायालयाने ट्विटरवरील खाती कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भातील ट्विटरचे धोरण स्पष्ट करण्याविषयी उत्तर मागवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ९ मंत्री शपथबद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह ९ मंत्र्यांनी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात २८ मार्च या दिवशी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पद आणि गोपनीयता यांची शपथ घेतली.

प्रेमविवाहामुळे मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरचा अधिकार संपत नाही ! – गुजरात उच्च न्यायालय

गुजरात उच्च न्यायालयाने एका मृत व्यक्तीची मालमत्ता तिच्या मुलीकडे तात्काळ हस्तांतरित करून तिच्या कह्यात देण्याचा आदेश दिला आहे. त्या मुलीच्या प्रेमविवाहाला तिच्या नातेवाइकांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कानशिलात लगावण्याचा युवकाचा प्रयत्न !

राज्याचे मुख्यमंत्रीच जेथे सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाचा विचारच न केलेला बरा !

(म्हणे) ‘गोवंश हत्या बंदी कायदा आहे, आता काही दिवसांनी श्वास घेण्यावरही बंदी घालतील !’ – नागराज मंजुळे, दिग्दर्शक

ज्या बहुसंख्य हिंदूंना चित्रपट दाखवून पैसे कमावले जातात, त्याच हिंदूंच्या धर्मावर टीका करणार्‍या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार टाकला, तर चुकीचे काय ?

‘विनाअनुदानित शाळा कृती समिती’चा इयत्ता १० वी आणि १२ वी च्या बोर्ड परीक्षेच्या पेपर पडताळणीवर बहिष्कार !

मागण्या मान्य होईपर्यंत पेपर पडताळणीसाठी शिक्षकांनी नकार दिला आहे. राज्यातील साडेसहा सहस्र शाळांमध्ये बोर्डाच्या पेपरचे गठ्ठे पडताळणीविना पडून आहेत.