प्रीतीस्वरूप आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण प्रत्येक क्षणी आचरणात आणणार्‍या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर (वय ४९ वर्षे) यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘साधेपणा’ हा सद्गुरु अनुताईंचा स्थायी भाव आहे. प.पू. गुरुदेवांप्रमाणे त्यांचे राहणीमान अत्यंत साधे; परंतु नीटनेटके आहे. ‘सद्गुरु अनुताई म्हणजे ईश्वराचे सगुण रूप, जे अतिशय सुंदर असून एका क्षणातच ‘आपण त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे’, असे आहे.