देशातील सर्व टोल नाके हटवणार ! – नितीन गडकरी

जी.पी.एस्. आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टम’ यंत्रणेद्वारे टोलची रक्कम वसूल होणार !

(टीप ः जी.पी.एस्. : व्यक्तीचा नेमका ठावठिकाणा दर्शवणारी इंटरनेट प्रणाली)

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – आगामी काळात देशातील सर्व टोल नाके हटवले जातील. रस्त्यावर आता टोलसाठी रांगा लावाव्या लागणार नाहीत. टोल वसूल करण्यासाठी जी.पी.एस्. आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टम’ सिद्ध केली जात आहे. यात टोल नाका पार केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापली जाणार आहे.

यासाठी सरकार लवकरच धोरण निश्चित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली.