राज्याचे मुख्यमंत्रीच जेथे सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाचा विचारच न केलेला बरा !
पाटलीपुत्र) – एका युवकाने राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी तातडीने त्या युवकाला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. मुख्यमंत्री येथे एका कार्यक्रमासाठी आले असतांना हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी चूक झाली असल्याने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे. हा युवक नक्की कोण आहे ? आणि त्याने असे कृत्य का केले ? यासंदर्भात पोलिसांकडून चौकशी चालू आहे.
Bihar | A youth tried to attack CM Nitish Kumar during a program in Bakhtiarpur. The accused was later detained by the Police.
(Viral video) pic.twitter.com/FoTMR3Xq8o
— ANI (@ANI) March 27, 2022