हिंगोली येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात पुनर्वसन केलेल्या गावांच्या विकासकामात मोठा घोटाळा ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप
जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात पुनर्वसन केलेल्या गावांच्या भौतिक सोयी सुविधांसाठी डिसेंबर २०२१ मध्ये १० कोटी २४ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला होता; परंतु या विकास कामात मोठा घोटाळा होत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.