जाहीर क्षमायाचना करण्याची शिवप्रेमींची मागणी !
केवळ क्षमायाचना नव्हे, तर महापुरुषांची विटंबना करणार्यांना कडक शासन व्हायला हवे, तरच अशा घटना थांबतील ! हिंदु सहिष्णु असल्यानेच धर्मांध असे धाडस करू धजावतात. कुणीही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अनादर करू धजावणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करावी ! – संपादक
पेण, १९ मार्च (वार्ता.) – धूलिवंदनाच्या निमित्ताने धर्मांध राहील कच्छी याने येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला रंग लावून विटंबना केली. त्या वेळी तो मद्य प्यायलेला होता.
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी पेण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी संघटना संघटित झाल्या. ‘कच्छी याने महाराजांच्या स्मारकाजवळ येऊन जाहीरपणे सर्व शिवप्रेमींची क्षमा मागावी आणि पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
यावर पोलिसांनी ‘‘स्मारकाजवळ क्षमायाचना नको, आम्ही त्याच्याकडून लेखी क्षमायाचना लिहून घेतो, त्याचे चित्रीकरण करून तुम्हाला देतो’’, असे सांगितले. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील पोलीस धर्मांधांना घाबरतात का ? अशा प्रकारची घटना एखाद्या हिंदूकडून मुसलमानांच्या संदर्भात घडली असती, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ? – संपादक)
येथील ‘सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’ या संघटनेचे उपाध्यक्ष श्री. समीर म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांना ‘ई-मेल’ करून योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले.