मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत स्वत:ची ‘मजूर’ म्हणून नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून त्यांना सत्र न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई सत्र न्यायालयाने दरेकर यांना २१ मार्चपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.