रत्नागिरी, १९ मार्च (वार्ता.) – देवीहसोळ, तालुका राजापूर येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांनी १९ मार्च २०२२ या दिवशी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या निवासस्थानी देहत्याग केला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, एक मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. पू. वागळेआजोबा १५ फेब्रुवारी २०१७ या दिवशी सनातनच्या व्यष्टी संतपदी विराजमान झाले होते.