ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ प्रदर्शित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे चित्रपटगृहांना निवेदन : हिंदुत्वनिष्ठांच्या रेट्यामुळे चित्रपट प्रदर्शित !

चित्रपट लागला नाही, हे लक्षात येताच पुढाकार घेऊन सर्व हिंदुत्वनिष्ठांना एकत्र करणार्‍या ‘हिंदवी स्वराज्य समूह गटा’चे आणि निवेदन देयासाठी सहभागी सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! हिंदूंनी जागृत होऊन आवाज उठल्यास यश मिळते त्याचे हे उदाहरण आहे !

अलाहाबाद उच्च न्यायालय याचिकेवर पुन्हा सुनावणी करणार !

वर्ष २०२१ मध्ये न्यायालयाने फेटाळली होती याचिका !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे महाविद्यालयाबाहेर बुरखा घालून मुलींचा विनयभंग करणार्‍या धर्मांध तरुणाला अटक

या घटनेनंतर बुरख्याचा वापर आतंकवादी कारवाया, गुंडगिरी आणि आता मुलींची छेडछाड करण्यासाठी होत असल्याचे उघड झाल्यानंतर तरी देशात सार्वजनिक ठिकाणी बुरख्यावर बंदी घातली पाहिजे !

पाकिस्तानमधील ‘ढाई चाल’ या आगामी चित्रपटात भारताविषयी गरळओक !  

पाकने कितीही खोटरडेपणा केला, तरी सत्य काय आहे, हे जगाला ठाऊक आहे ! अशा चित्रपटांवर भारतात बंदी घातली पाहिजे !

‘द कश्मीर फाइल्स’चे निर्माता आणि दिग्दर्शक यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट !

याविषयी अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर या भेटीची छायाचित्रे प्रसारित करून लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी यांची भेट सुखद होती. त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’साठी काढलेले उत्साहवर्धक उद्गार आमच्यासाठी विशेष ठरले.

सौदी अरेबियात आतंकवादी संघटनांशी संबंधित असणार्‍या ८१ जणांना एकाच दिवशी फाशी

भारतात आतंकवाद्यांनाही साधी शिक्षा होत नाही, तेथे त्यांच्याशी संबंधित असणार्‍यांना शिक्षा कुठे होणार ? भारतात अशी स्थिती असल्यामुळे येथील जिहादी आतंकवाद ३ दशकांनंतरही संपू शकलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !

मडगाव (गोवा) येथील ‘आयनॉक्स’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ ‘हाऊसफूल’ नसतांना तशी सूचना !

गोव्यात आता ‘चित्रपट जिहाद’ला प्रारंभ झाला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकीटविक्री दाबून ठेवणे आणि चित्रपटाला लोकांची पसंती नसल्याचा आभास निर्माण करणे, असा प्रकार गोव्यात चालू झाला आहे.

इराणमधून इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर डागण्यात आली १२ क्षेपणास्त्रे !

यात मोठी हानी झाली आहे. नुकतेच या दूतावासातील कामकाज अन्यत्र हालवण्यात आले होते. त्यामुळे येथे कुणीही नव्हते.

रशियाने युक्रेन आणि पोलंड यांच्या सीमेजवळ केला ३० क्षेपणास्त्रांचा मारा !

रशियाने युक्रेन-पोलंड या देशांच्या सीमेजवळ ३० क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आक्रमण यावोरिव तळावर झाले असून यामध्ये ३५ लोक ठार झाले असून १३४ जण घायाळ झाले आहेत.

मतदारसंघात मांसविक्रीची दुकाने आणि उपाहारगृहे दिसता कामा नयेत !

लोणी (उत्तरप्रदेश) येथील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांची सरकारी अधिकार्‍यांना चेतावणी