|
हिंदूबहुल भारतात स्वतःची धार्मिक स्थळे परत मिळवण्यासाठी हिंदूंना प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढावी लागते, हे लज्जास्पद ! – संपादक
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीला ‘श्रीकृष्णजन्मभूमी’ अशी मान्यता देण्याच्या मागणीसाठी प्रविष्ट केलेली याचिका पुन्हा सुनावणीसाठी घेतली आहे. यापूर्वी १९ जानेवारी २०२१ मध्ये अशी मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली होती. आता या याचिकेवर पुढील सुनावणी २५ जुलै या दिवशी होणार आहे. या याचिकेत ‘शाही ईदगाह मशीद हटवून तेथे श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर उभारावे’, ‘येथील सर्व भूमी हिंदूंना द्यावी’, तसेच ‘त्यासाठी ‘जन्मस्थान ट्रस्ट’ बनवावे’, अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत.
मथुरा शाही ईदगाह मस्जिद को कृष्ण जन्मभूमि की मान्यता देने की मांग की याचिका पर सुनवाई 25 जुलाई कोhttps://t.co/vTtpwhxRpa
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) March 12, 2022
कंस याने भगवान श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना कारागृहात टाकले होते. तेथेच श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. तेच स्थान आताची ईदगाह मशीद आहे, असे याचिकेत म्हटले आहे. मोगलांच्या काळात येथील मंदिर पाडून तेथे ईदगाह मशीद बांधण्यात आली. या जागेवर पुरातत्व विभागाकडून खोदकाम आणि सर्वेक्षण करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.