नवी देहली – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
I am so glad for you @AbhishekOfficl you have shown the courage to produce the most challenging truth of Bharat. #TheKashmirFiles screenings in USA proved the changing mood of the world in the leadership of @narendramodi https://t.co/uraoaYR9L9
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 12, 2022
१. याविषयी अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर या भेटीची छायाचित्रे प्रसारित करून लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी यांची भेट सुखद होती. त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’साठी काढलेले उत्साहवर्धक उद्गार आमच्यासाठी विशेष ठरले. अन्य कोणताही चित्रपट बनवतांना जितका अभिमान वाटला नव्हता, तितका हा चित्रपट बनवतांना वाटला.
२. अग्रवाल यांच्या या ट्वीटवर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, मला याचा आनंद आहे की, अभिषेक यांनी भारतातील सर्वांत आव्हानात्मक चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस दाखवले. ‘द कश्मीर फाइल्स’चे प्रदर्शन अमेरिकेत होणेे, हे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाचे मन पालटत आहे, याचे दर्शक आहे.