घटनेच्या वेळी मी देहली येथे असतांनाही माझ्यावर गुन्हा नोंद केल्यास सभागृहातच फाशी घेईन ! – आमदार रवी राणा यांची धमकी

अमरावती येथील महापालिकेच्या आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर पोलिसांनी रवी राणा यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ आणि ३५३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

थकबाकीमुळे नव्हे, तर भ्रष्टाचारामुळे महावितरण डबघाईला ! – आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

भ्रष्टाचारामुळे शासकीय आस्थापने डबघाईला आणणार्‍यांवर सरकार कारवाई कधी करणार ?

पिंपरी आणि धुळे येथील शिवमंदिरांमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी भाविकांची गर्दी !

पिंपरी-चिंचवडमधील काही शिवमंदिरांमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. चिखली येथील ताम्हाणे वस्तीतील तुळजाभवानी मंदिर येथील नंदीला दूध पाजण्यासाठी रात्री पुष्कळ गर्दी झाली होती.

‘चांगभल’च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री जोतिबाचा तिसरा खेटा पार पडला !

पहाटे ४ वाजता घंटानाद करून मंदिराचे द्वार भाविकांसाठी उघडण्यात आले. गेली २ वर्षे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वयोवृद्ध आणि लहान मुले यांना मंदिरात प्रवेश नव्हता.

शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण करणार्‍यांच्या विजयाला ‘शौर्यदिन’ कसे घोषित करू शकतो ? – दिवाकर रावते, शिवसेना

कोरेगाव येथे इंग्रजांच्या समवेत झालेल्या लढाईमध्ये ‘महार रेजिमेंट’ इंग्रजांच्या बाजूने लढले. त्यामुळे महार समाजाला ‘महार रेजिमेंट’चा अभिमान वाटत असेल; मात्र हे चुकीचे आहे. इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांवर आक्रमण केले होते.

सामाजिक बांधीलकीतून केली आहे प्रशिक्षण केंद्राची स्थापना ! – तुषार हळदवणेकर

तळवडे (ता. राजापूर, रत्नागिरी) येथे पितांबरी डिजिटल केअर सोल्युशन्स प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन !

भ्रष्टाचाराचे ‘चित्रां’कन !

चित्रा रामकृष्ण यांनी स्वतःची कुशाग्र बुद्धी आणि क्षमता विधायक कार्यासाठी न वापरता विघातक कामांसाठी वापरली. असे ‘बुद्धीवान’ भ्रष्टाचारी हे भारतीय व्यवस्थेसाठी अधिक धोकादायक आहेत, हे लक्षात घ्या !

कोणतीही करवाढ नसलेला ६७३ कोटी रुपयांचा जमेचा कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प नागरिकांसाठी सादर ! – डॉ. कादंबरी बलकवडे, आयुक्त, कोल्हापूर महापालिका

स्वत:च्या इलेक्ट्रिक वाहनाकरता ‘चार्जिंग’ स्थानक उभारण्यास आणि त्यातून वाहनधारकांना ‘चार्जिंग’ सुविधा उपलब्ध केल्यास मालमत्ताकरात २ टक्के सूट, तसेच गृहनिर्माण संस्थेत सामायिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास मालमत्ता करात ३ टक्के सूट देण्यात येणार आहे.

पत्रकारांना स्वरक्षणासाठी शस्त्र आणि शस्त्र परवाने शासनाने विशेष कोट्यातून विनामूल्य द्यावेत ! – ‘डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडंट असोसिएशन’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बातमीचा राग मनात धरून सध्या पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्यास त्या पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.

अशा चित्रपटांवर बहिष्कारच हवा !

साजिद नाडियावाला निर्मित आणि फर्हद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटात ‘होली पे गोली’ असे आक्षेपार्ह वाक्य असल्याने हिंदूंकडून या चित्रपटाला सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.