सांगली, ७ मार्च (वार्ता.) – देश आणि राज्य येथील पत्रकारांवर होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी सरकारने पत्रकार संरक्षण कायदा केला; मात्र पत्रकारांवर होणारी आक्रमणे, तसेच त्यांना धमकावण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. तरी पत्रकारांना स्वरक्षणासाठी शस्त्र आणि शस्त्र परवाने शासनाने विशेष कोट्यातून विनामूल्य द्यावेत, अशी मागणी ‘डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडंट असोसिएशन’चे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बातमीचा राग मनात धरून सध्या पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्यास त्या पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी पत्रकारांच्या विविध संघटनेच्या पदाधिकार्यांना समवेत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे.