भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

या कायद्यामुळे विवाह, घटस्फोट, भूमी, संपत्ती आणि सर्व लोकांसाठी वारसा यासंबंधी समान कायदे प्रदान केले जातील, असा विश्‍वास आहे. यामुळे सामाजिक सौहार्द वाढेल, महिला सक्षमीकरण होईल आणि सांस्कृतिक संरक्षण होण्यास साहाय्य होईल.

भारताच्या अंतर्गत गोष्टींवर करण्यात येणारी विधाने सहन केली जाणार नाहीत ! – भारताने पाकसह अन्य देशांना खडसावले

नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या प्रकरणी भारतावर टीका केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना भारताची वरील भूमिका मांडली.

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या मार्गावरील चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देणार ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

लता मंगेशकर या रामभक्त होत्या. त्यामुळे अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभे रहात असतांना लतादीदींचेही स्मरण व्हावे, असे आम्हाला वाटते. त्यासाठी श्रीराममंदिराकडे जाणारे जे मुख्य मार्ग असतील, त्यांवरील एका प्रमुख चौकाला भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव देण्यात येईल.

माझ्या शक्तीद्वारे रशिया आणि युक्रेन यांच्यात होणारे युद्ध थांबवून दाखवतो ! – जगप्रसिद्ध जादूगाराचा दावा

माझ्याकडे असलेल्या शक्तींचा वापर करून मी रशिया आणि युक्रेन यांच्यामधील होणारे युद्ध थांबवतो अन् जगाला तिसर्‍या विश्‍वयुद्धापासून वाचवतो, असा दावा युरी गेलर या ७५ वर्षीय जगप्रसिद्ध जादूगाराने केला आहे

हिजाबविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट केल्यामुळे हिंदु तरुणाच्या घरावर धर्मांधाकडून आक्रमण

हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आदींचा अवमान केल्यावर हिंदू कधी असे आक्रमण करतात का ? तरीही हिंदूंना तालिबानी ठरवले जाते; मात्र प्रत्यक्षात तालिबानी कृत्य करणार्‍यांच्या विरोधात देशातील निधर्मीवादी गांधीवादी भूमिका घेतात, हे लक्षात घ्या !

कर्नाटकमध्ये भगवे उपरणे घातल्यामुळे धर्मांध विद्यार्थ्यांकडून मारहाण झाल्याने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न  

याला उत्तरदायी असणार्‍यांवर राज्यातील भाजप सरकारने कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

आधुनिक वैद्यांना अर्थात् डॉक्टरांना आता महर्षि चरक यांची शपथ घ्यावी लागणार !

जळी, स्थळी भगवाच दिसणार्‍या काँग्रेसला कधी भारतीय अस्मिता आणि परंपरा यांचा आदर करावा, असे का वाटत नाही ? महर्षि चरक यांच्याविषयी काँग्रेसला द्वेष का ?

हिजाब प्रकरणामागे  ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चा हात ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश

सरकारने या संघटनेवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

हिंदूंच्या दु:स्थितीमागील कारण !

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले