भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची घोषणा

ज्या राज्यांत सध्या भाजपचे सरकार आहे, तेथेही आणि केंद्र सरकारनेही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर राज्यात समान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केली.

मुख्यमंत्री धामी म्हणाले की, या कायद्यामुळे विवाह, घटस्फोट, भूमी, संपत्ती आणि सर्व लोकांसाठी वारसा यासंबंधी समान कायदे प्रदान केले जातील, असा विश्‍वास आहे. यामुळे सामाजिक सौहार्द वाढेल, महिला सक्षमीकरण होईल आणि सांस्कृतिक संरक्षण होण्यास साहाय्य होईल.