भारताच्या अंतर्गत गोष्टींवर करण्यात येणारी विधाने सहन केली जाणार नाहीत ! – भारताने पाकसह अन्य देशांना खडसावले

कर्नाटकातील हिजाबचे प्रकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची

नवी देहली – कर्नाटकमधील काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाविषयीचा वाद चालू आहे. त्याची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयात चालू आहे. हे सूत्र आमची घटनात्मक चौकट, कार्यपद्धती, लोकशाही मूल्ये आणि धोरणे यासंदर्भात तपासले जात आहे आणि सोडवलेही जात आहे.

जे भारताला व्यवस्थित ओळखतात, तेही सर्व वास्तव परिस्थिती समजून घेतील; पण आमच्या अंतर्गत सूत्रांवर हेतूपुरस्सर करण्यात येणारी विधाने सहन केली जाणार नाहीत, अशा शब्दांत भारताने पाक आणि अन्य देशांना कर्नाटकातील हिजाबच्या प्रकरणी विधाने करण्यावरून खडसावले.

नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या प्रकरणी भारतावर टीका केली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना भारताची वरील भूमिका मांडली.