
नवी देहली – माझ्याकडे असलेल्या शक्तींचा वापर करून मी रशिया आणि युक्रेन यांच्यामधील होणारे युद्ध थांबवतो अन् जगाला तिसर्या विश्वयुद्धापासून वाचवतो, असा दावा युरी गेलर या ७५ वर्षीय जगप्रसिद्ध जादूगाराने केला आहे; मात्र त्यासाठी ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन किंवा युक्रेनच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझे साहाय्य मागावे’, अशी अट त्यांनी घातली आहे. ‘त्यांनी विनंती केल्यानंतर मी त्यावर नीट विचार करीन आणि मगच पुढची पावले उचलीन’, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘मी याआधीही काही युद्धे रोखली आहेत, तसेच रशिया विरुद्ध ‘नाटो’ सदस्यांमधील हे युद्धही सहजपणे रोखू शकतो’, असे त्यांनी सांगितले; परंतु हे युद्ध कसे रोखणार, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. मनाच्या शक्तीच्या आधारे चमचे वाकवण्याचे खेळ दाखवून युरी यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे.
Spoon-bender Uri Geller says he can use his powers to stop Putin from triggering WW3 https://t.co/pQQ8VDSsbb pic.twitter.com/Det0ULghvo
— Daily Star (@dailystar) February 10, 2022
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !