पोलीसदलाच्या भरती प्रक्रियेत घोटाळे करणारे कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक
नागपूर – येथील राज्य राखीव पोलीस दल भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत ३ उमेदवारांच्या जागी भलत्याच ३ बनावट उमेदवारांनी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी दिली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नवीन कामठी आणि एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात ६ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बनावट उमेदवारांनी चाचणी देऊन भरघोस गुण मिळवले आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबर मासात झालेल्या नागपूर शहर पोलीस दलातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी शहर पोलिसांनी काही आरोपींना अटक केल्यानंतर आणखी १० उमेदवार पोलिसांचे लक्ष्य होते.