महंत मावजीनाथ महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍याला त्वरित अटक करण्यात यावी !

अशी मागणी का करावी लागते ? आक्रमण झाल्यावर लगेचच प्रशासन कारवाई का करत नाही ?

कालिपुत्र कालिचरण महाराज यांची सुटका करून त्यांच्यावर लादलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रहित करण्यात यावा !

या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.

प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !

देवस्थानच्या भूमी घोटाळा प्रकरणामध्ये समावेश असलेले उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचे निलंबन !

केवळ निलंबन नको, तर बडतर्फच करायला हवे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे देवस्थानच्या भूमींमध्ये घोटाळा केला जातो, हे दुर्दैवी !

गडांवरील थडगी हिंदूंना आशीर्वाद देतील का ?

गडांचे इस्लामीकरण झाले, तर हिंदूंची भावी पिढी निधर्मी होईल. छत्रपतींचे शौर्य हिंदूंना कळावे, यासाठी गडांचे होणारे इस्लामीकरण रोखण्याचे दायित्व हे हिंदूंचेच आहे आणि त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच उपाय आहे !

२४ जानेवारीला नवी मुंबई विमानतळाचे काम बंद करण्याचा प्रकल्पग्रस्तांचा निर्धार !

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, राज्य सरकार दि.बा. पाटील यांच्या नामकरणाचा ठराव मांडत नाही, तोपर्यंत प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाहीत.

हिंदु जनजागृती समिती पुष्कळ चांगला उपक्रम राबवत असून या संदर्भातील परिपत्रक काढू ! – अजयकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

निधन वार्ता 

सनातनच्या साधिका श्रीमती रेखा साने यांचे पती हिराजी साने (वय ७६ वर्षे) यांचे १० जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

बांगलादेशी घुसखोरांच्या देशविघातक कारवाया जाणा !

नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे यांचा पुरवठा करणारी बांगलादेशी घुसखोर महिला कनिझ फातिमा हिला देहली येथे अटक करण्यात आली. तिच्याकडून ७१ लाख रुपये रोख रक्कम आणि २ महागड्या चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या.