प्रशासनाची निष्क्रीयता, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव, धर्मशिक्षणाचा अभाव आणि निद्रिस्त हिंदू यांमुळे कर्नाटक राज्यातील श्री मुरुडेश्वर मंदिराची झालेली दुरवस्था !

हिंदूंनो, पवित्र आणि चैतन्यदायी मंदिरांचे कुटील धर्मांधांपासून रक्षण होण्यासाठी त्यांना मंदिर परिसरात जागा देऊ नका ! -संपादक 

‘२४.१.२०१९ या दिवशी मी आणि माझे यजमान कर्नाटक राज्यातील ‘श्री मुरुडेश्वर मंदिर’ येथे दर्शनासाठी गेलो होतो. उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुरुडेश्वर येथील जमिनीचा काही भाग समुद्राच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे त्याच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. त्या भूभागावर श्री मुरुडेश्वर देवाचे म्हणजे शिवाचे स्थान आहे. श्री मुरुडेश्वर मंदिराला अतिशय सुंदर असे निसर्गसौंदर्य लाभले आहे; परंतु तेथे गेल्यावर तेथील प्रशासनाची निष्क्रीयता, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव, धर्मशिक्षणाचा अभाव आणि निद्रिस्त हिंदू यांच्यामुळे मंदिराची झालेली दुरवस्था लक्षात आली. ती पुढे देत आहे.

१. मंदिरात जाण्यासाठी दिशादर्शक फलक नसून माहिती देणारे स्वयंसेवकही उपस्थित नसणे आणि त्यामुळे भाविकांचा गोंधळ उडणे !

‘श्री मुरुडेश्वर मंदिरात दर्शनासाठी पुष्कळ दूरून आणि परभाषिक भाविक येतात; परंतु तेथे वाहनतळ किंवा मंदिरात जाण्यासाठी दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे अनेक भाविकांचा गोंधळ होत होता. त्याचा परिणाम म्हणून अनेकांनी आपली वाहने समुद्रकिनारी लावली होती.

२. मंदिराच्या बाहेरील परिसरात असलेल्या धर्मांधांच्या विक्रीकक्षांमुळे भाविकांची होणारी गैरसोय !

श्री. उज्ज्वल कापडिया

मंदिराच्या बाहेरील परिसरात धर्मांधांनी खाद्यपदार्थ, कपडे, दागिने, शोभेच्या वस्तू, भांडी इत्यादींचे विक्रीकक्ष (स्टॉल) लावले आहेत. लोकांना चालण्यासाठी पदपथ बनवले आहेत. त्यांवरही विक्रीकक्ष (स्टॉल) लावलेले असल्याने लोकांना आणि भाविकांना मुख्य मार्गावरून (रस्त्यावरून) चालत जावे लागते. त्यामुळे त्या मार्गावर लोकांची गर्दी झाल्याने वाहनांना मंदिरापर्यंत जाणे अवघड जाते. त्याचप्रमाणे सुटीच्या कालावधीमध्ये, म्हणजे शनिवारी आणि रविवारी लोकांची गर्दी पुष्कळ वाढल्याने पोलीस भाविकांना मंदिराच्या ५०० मीटर आधीच वाहने थांबवण्यास सांगतात. त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत उन्हातून चालत जावे लागते. ‘त्या विक्रीकक्षांवर वस्तू विकत घेणारे आणि समुद्रावर फिरायला येणारे मुख्यत्वे धर्मांधच असतात’, असे लक्षात आले.

३. मंदिराच्या बाहेरील परिसरातच धर्मांधांनी मांसाहार विक्री केल्याने मंदिराचे पावित्र्य नष्ट होण्याचा धोका उद्भवणे !

मंदिराच्या बाहेरील परिसरातच धर्मांधांनी मांसाहाराचे विक्रीकक्ष लावले आहेत. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होण्याचा धोका असून दर्शनाला येणार्‍या भाविकांना त्या दुर्गंधीतून जावे लागते.

४. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी लोक देवदर्शनासाठी न येता पर्यटनस्थळ म्हणून येणे आणि हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांचा तीर्थक्षेत्र अन् मंदिर यांच्याप्रती भाव अल्प होऊन तेथील पावित्र्य न्यून होणे !

सौ. उमा कापडिया

मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी लोक देवदर्शनासाठी न येता एक पर्यटनस्थळ म्हणून येतात. मुरुडेश्वर येथे येणारे बहुतेक लोक धर्मांधच असतात. मंदिराच्या परिसरात छायाचित्र काढणे, मोठ्याने बोलणे, जोरजोरात हसणे इत्यादींसाठीच ते येतात. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होऊन तेथील वातावरणात त्रासदायक स्पंदने जाणवतात. दुर्दैवाने तिथे येणारे हिंदूसुद्धा देवदर्शनाला महत्त्व न देता पाश्चात्त्य कपडे घालून येणे, मोठ्याने बोलणे, मंदिराच्या परिसरात ‘सेल्फी’ (छायाचित्र) काढणे इत्यादी प्रकार करतात. हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांचा तीर्थक्षेत्र आणि मंदिर यांप्रतीचा भाव अल्प झाल्यामुळे तेथील पावित्र्य न्यून होत आहे.

५. हिंदु धर्माचे महत्त्व जाणून तशी कृती करणारे विदेशी !

मंदिरात दर्शनासाठी आलेले विदेशी लोक मात्र मंदिराचा इतिहास, रचना, कलाकृती इत्यादींविषयी मार्गदर्शकाकडून (‘गाईड’कडून) माहिती घेत होते. त्यांना मंदिराविषयी आदर वाटत होता. त्यांच्यातील एक गट स्वतःहून आमच्याशी बोलायला आला. ‘त्या सर्वांनीच कपाळावर टिळा लावला होता’, असे त्यांच्याकडे पाहून लक्षात आले. आमच्यासह छायाचित्र काढतांना त्यांनी सर्वांनीच हात जोडून नमस्काराची मुद्रा केली होती.

६. मंदिरांच्या संदर्भातील धर्मांधांचे षड्यंत्र जाणा !

आजपर्यंत मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करून ती नष्ट केली. ‘दक्षिण भारतात मात्र बर्‍याच प्रमाणात मंदिरे सुरक्षित राहिली’, असे म्हणतात; परंतु धर्मशिक्षणाचा अभाव, प्रशासनाची निष्क्रीयता, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव आणि निद्रिस्त हिंदू यांमुळे मंदिरांची अशी दुःस्थिती झाली आहे. त्यामुळे ‘धर्मांध आता प्रत्यक्ष आक्रमण न करता मंदिरांच्या परिसरांचे नियंत्रण (ताबा) मिळवून मंदिरांचे पावित्र्य नष्ट करण्याचा कट रचत आहेत’, असे म्हणता येईल.

‘मंदिरांची अशी दुरवस्था पालटण्यासाठी हिंदूंमध्ये लवकरात लवकर जागृती होऊन शीघ्र ‘ईश्वरी राज्य’ (हिंदु राष्ट्र) यावे’, अशी श्रीचरणी प्रार्थना !’

– सौ. उमा कापडिया आणि श्री. उज्ज्वल कापडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०१९)