देवस्थानच्या भूमी घोटाळा प्रकरणामध्ये समावेश असलेले उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचे निलंबन !

केवळ निलंबन नको, तर बडतर्फच करायला हवे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे देवस्थानच्या भूमींमध्ये घोटाळा केला जातो, हे दुर्दैवी ! – संपादक 

उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव

बीड – देवस्थानच्या भूमी घोटाळा प्रकरणामध्ये समावेश असलेले उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचे १४ जानेवारी या दिवशी निलंबन करण्यात आले आहे. येथे भूमी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (एस्.आय.टी.) स्थापना करण्यात आली होती. पथकाच्या माध्यमातून ही चौकशी चालू असतांना भूमी घोटाळ्यात हात असणारे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी अनियमितता केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी शासनाकडे दिला होता. (देवस्थानच्या भूमींचाच घोटाळा होतो, कधी मशीद आणि मदरसा यांमध्ये घोटाळा झाल्याचे ऐकले आहे का ?, त्यामुळे भक्तांनीच जागरूक होऊन देवस्थानांच्या भूमींचे संरक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. – संपादक)

जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या भूमीमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. शेकडो एकर भूमी अधिकार्‍यांच्या साहाय्याने बांधकाम व्यावसायिकांनी घशात घालण्याचे काम केले असून या प्रकरणी आष्टी तालुक्यात ३ गुन्हे नोंद झाले, तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १ गुन्हा नोंद करण्यात आला होता.