कालिपुत्र कालिचरण महाराज यांची सुटका करून त्यांच्यावर लादलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रहित करण्यात यावा !

हिंदु राष्ट्र सेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देतांना हिंदु राष्ट्र सेनेचे पदाधिकारी

संभाजीनगर, १५ जानेवारी (वार्ता.) – कालिपुत्र कालिचरण महाराज यांची लवकरात लवकर सुटका करून त्यांच्यावर लादलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रहित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

१. परकीय राजवटीत धर्मांतरासाठी जसा भारतमातेच्या सुपुत्रांचा, माता-भगिनींचा, थोर साधू-संतांचा छळ झाला त्याचप्रमाणे सध्या काँग्रेसच्या राजवटीतही होत आहे. कालिपुत्र कालिचरण महाराज यांनी मांडलेले मत हे कोट्यवधी भारतियांची सुप्त प्रतिक्रिया आहे. त्यांना भारतभरातून मिळणारा पाठिंबा हे त्याचे जिवंत प्रमाण आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

२. विश्वगुरु असणार्‍या प्रभु रामचंद्रांचे विडंबन करणारे खरे राष्ट्रद्रोही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणारे खरे राष्ट्रद्रोही आहेत. मुंबई बाँबस्फोटातील दोषी याकूब मेननला फाशी होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे खरे राष्ट्रद्रोही आहेत, गांधींचे खरे दोष दाखवणे, ही राष्ट्रभक्ती आहे आणि अशा भारताच्या सुपुत्र असणार्‍या खर्‍या महात्म्यांच्या रक्षणार्थ अन् समर्थनार्थ हिंदु राष्ट्र सेना पूर्ण सामर्थ्यानिशी ठामपणे उभी आहे.