उपोषण करणार्‍या एस्.टी. कर्मचार्‍याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन !

एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभर एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू आहे.

शेतकरी हित कि अहित ?

‘जनतेला काय आवडते ? यापेक्षा जनतेच्या जे हिताचे आहे’, त्यानुसार निर्णय घेण्यात शासनकर्त्यांची खरी कसोटी आहे. जे योग्य आहे, त्याला शेवटपर्यंत धरून रहाणे आणि ज्यांना समजत नाही, त्यांना समजावून सांगणे हे कौशल्यच आहे.

‘सेल्फी पॉईंट’ नको !

‘सेल्फी पॉईंट’वर ‘सेल्फी’ काढल्यामुळे केवळ मौजमजा एवढेच साध्य होणार आहे. याऐवजी मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होईल, यादृष्टीने कृती होणे आवश्यक आहे.

व्यापार्‍याला जाळ्यात अडकवून खंडणी उकळणार्‍या धर्मांध महिलेसह तीन जण अटकेत !

कोल्हापूरच्या साखर व्यापार्‍यास हनी ट्रॅपमध्ये (जाळ्यात) अडकवून त्यांच्याकडून ३ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली.

‘विश्व फाऊंडेशन’च्या वतीने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट; शिवपुरीला भेट देण्याचे गडकरी यांचे आश्वासन !

शिवपुरी येथील ‘विश्व फाऊंडेशन’च्या वतीने परमसद्गुरु गजानन महाराज यांच्या पादुकादर्शन आणि अग्निहोत्रप्रचार दौरा चालू आहे. या दौर्‍याच्या निमित्ताने नागपूर येथे केंद्रीय परिवहनमंत्री श्री. नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी सौ. कांचन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.

चंद्रपूर येथे वाघाच्या आक्रमणात महिला वनरक्षकाचा मृत्यू !

गस्तीवर असतांना वाघाने अचानक केलेल्या आक्रमणात कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक महिला ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे.

‘सीबर्ड ट्रान्सपोर्ट’च्या कर्मचार्‍यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर शिबिर

खरा आनंद भगवंताच्या नामजपात आहे. आपण आध्यात्मिक आणि लौकिक प्रगतीसाठी स्वतःच्या कुलदेवतेचा नामजप करावा. स्वतःचे कार्य प्रामाणिकपणे केले, तर भगवंताची कृपा प्राप्त होऊन व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवनात यश मिळते.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव !

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून शिवतीर्थावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला.

धर्मांधांचे दंगल घडवण्याचे षड्यंत्र जाणा !

सिलहट येथील हिंदूंच्या मंदिरात लपूनछपून कुराण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या मीजान नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने मंदिरात कुराण नेण्याच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

‘आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत.