उपोषण करणार्‍या एस्.टी. कर्मचार्‍याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन !

प्रतिकात्मक चित्र

नगर – एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभर एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. घरी उपोषणाला बसलेले विजय राठोड नगर शहरातील तारकपूर येथील संपातही सहभागी झाले होते. मिरावली पहाड येथे दर्शनासाठी गेल्यावर त्यांना त्रास झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती केल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मागील ५-६ दिवसांपासून त्यांनी अन्न घेतले नव्हते. दळणवळण बंदीच्या काळात ४ मास केलेल्या कामाचा त्यांना मोबदलाही मिळाला नव्हता.