धर्मांधांचे खरे स्वरूप ओळखा !
मुंबई – कोल्हापूरच्या साखर व्यापार्यास हनी ट्रॅपमध्ये (जाळ्यात) अडकवून त्यांच्याकडून ३ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘फॅशन डिझायनर’ महिलेसह दोन सराफांना अटक केली आहे. लुबना वझीर, अनिल चौधरी आणि मनीष सोदी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही अंधेरीतील रहिवासी आहेत.
कोल्हापूर येथील साखरेचे व्यापारी व्यवसायानिमित्त मागील वर्षी मुंबईत आल्यावर त्यांची लुबना वझीर हिच्याशी ओळख झाली. तिने व्यापार्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून त्यांचा अश्लील व्हिडिओ काढला. त्यानंतर हा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत आतापर्यंत ३ कोटी २६ लाख रुपये उकळले. पुढे आणखी पैशांची मागणी झाल्याने तक्रारदाराने गुन्हे शाखेत तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार १७ लाखांची मागणी केलेले पैसे घेतांना अंधेरीतील एका ‘कॉफी शॉप’मध्ये वरील तिघांना अटक करण्यात आली.