चंद्रपूर – गस्तीवर असतांना वाघाने अचानक केलेल्या आक्रमणात कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक महिला ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोलारा कोअर क्षेत्रात २० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. (अरण्यात हिंसक प्राण्यांचा धोका असतो, हे ठाऊक असूनही वन विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी दक्षता घेऊन उपाययोजना केली नव्हती का ? – संपादक) स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी सांत्वन केले. कुटुंबियांना १५ लाख रुपयांचे साहाय्य आणि पतीला नोकरी देण्याचे घोषित केले.