अग्निहोत्राचा प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांचा देहत्याग !

प्रतिदिन अग्निहोत्र करणारे आणि अग्निहोत्राचा भारतासह विदेशातही प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांनी पुणे येथे २६ ऑक्टोबर २०२१ या रात्री ११ वाजता देहत्याग केला.

नवाब मलिक यांचा ‘अंडरवर्ल्ड’शी संबंध, शरद पवार यांना पुरावे पाठवणार ! – देवेंद्र फडणवीस

मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे अमली पदार्थांचा पुरवठादार जयदीप राणा याच्यासमवेत असलेले छायाचित्र प्रसारित केले आहे.

विष्णुदास भावे गौरवपदक सोहळा कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे रहित !

‘अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’च्या वतीने प्रतिवर्षी ५ नोव्हेंबर म्हणजेच रंगभूमीदिनी देण्यात येणारा विष्णुदास भावे गौरवपदक सोहळा कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे रहित करण्यात आला आहे.

नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्‍यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य !

गोवा राज्य आर्थिक संकटात असतांना नरकासुराच्या प्रतिमांवर पैसा खर्च करणे; म्हणजे नरकासुराच्या प्रतिमेसमवेत तो पैसा जाळल्याप्रमाणेच आहे !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे राहुल गांधी राजकीय पर्यटनासाठी गोव्यात ! – तेजस्वी सूर्या, खासदार, भाजप

ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी राजकीय पर्यटनासाठी गोव्यात आले आहेत, असा आरोप भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

१५ दिवसांच्या विश्रांतीनंतर लोहगाव विमानतळाची सेवा चालू !

१५ दिवसांच्या विश्रांतीनंतर विमानसेवा चालू होत असल्याने विमान सेवेचे दरही वाढले आहेत. विमानांची वाहतूक सेवा चालू झाल्याने विमानतळ प्रशासनाने हिवाळ्यातील उड्डाणांचे वेळापत्रक लागू केले आहे.

अखेर अनिल देशमुख अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित !

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना वारंवार समन्स बजावले होते. तरीही ते चौकशीसाठी उपस्थित रहात नव्हते.

कार्तिक वारीसाठी ६ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत २४ घंटे मुखदर्शन ! – मंदिर समितीचा निर्णय

यात्रेला येणार्‍या भाविकांना लसीकरणाची कोणतीही अट न घालण्याचा निर्णय बैठकीत झाला असून मुखपट्टी आणि सामाजिक अंतराचे नियम मात्र पाळले जाणार आहेत.

मंकावती तीर्थकुंड हडप केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात देवानंद रोचकरी बंधूंना जामीन संमत !

तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि पुरावे सिद्ध केल्याच्या प्रकरणी आरोपी रोचकरी बंधूंना संभाजीनगर उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर या दिवशी जामीन संमत केला आहे.

ममता बॅनर्जी या प्रादेशिक पक्षांच्या अभिमानाचे प्रतीक ! – विजय सरदेसाई, आमदार

‘गोवा फॉरवर्ड’ पक्ष हा तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला जाणार नाही. लोकांना असे झालेले नको; मात्र निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना संघटित करणे आवश्यक आहे.