पुणे – १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर लोहगाव विमानतळावरून विमानांच्या उड्डाण सेवेस प्रारंभ झाला आहे. दिवसभरात ५२ विमानांची उड्डाणे होणार असून तेवढ्याच विमानांचे लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे.
१५ दिवसांच्या विश्रांतीनंतर विमानसेवा चालू होत असल्याने विमान सेवेचे दरही वाढले आहेत. विमानांची वाहतूक सेवा चालू झाल्याने विमानतळ प्रशासनाने हिवाळ्यातील उड्डाणांचे वेळापत्रक लागू केले आहे.