पणजी, १ नोव्हेंबर (वार्ता.) – तृणमूल काँग्रेस म्हणजे इंग्रजीत ‘टी.एम्.सी.’. यामधील ‘टी’ म्हणजे ‘टेररिझम्’ (आतंकवाद), ‘एम्.’ म्हणजे ‘माफिया’ आणि ‘सी’ म्हणजे ‘करप्शन’ (भ्रष्टाचार) असे आहे. सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे राहुल गांधी राजकीय पर्यटनासाठी गोव्यात आले आहेत, असा आरोप भाजपचे खासदार तथा ‘भाजप युवा मोर्चा’चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.
Mamata, Rahul are political tourists in Goa: BJP MP Tejasvi Suryahttps://t.co/f5ICTjH5wh
— Goa Chronicle (@goachronicle) October 31, 2021
खासदार तेजस्वी सूर्या पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात राजकीय संस्कृती गुण्यागोविंदाने रहायला शिकवते. विरोधी विचारधारा असलेल्यांची गोव्यात हत्या केली जात नाही. गोव्यात प्रत्येकाचा सन्मान करण्याची संस्कृती आहे. तृणमूल काँग्रेस गोव्यात बंगालमधील आतंकवाद आणि हिंसाचार यांनी भरलेले राजकारण आणू पहात आहे. तृणमूलची संस्कृती गोव्यात येणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी आतंकवाद आहे तेथे पर्यटन तग धरू शकत नाही. काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर नेते नाहीत. गोव्याचा विकास केवळ भाजपच करू शकते.’’