विष्णुदास भावे गौरवपदक सोहळा कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे रहित !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली, १ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’च्या वतीने प्रतिवर्षी ५ नोव्हेंबर म्हणजेच रंगभूमीदिनी देण्यात येणारा विष्णुदास भावे गौरवपदक सोहळा कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे रहित करण्यात आला आहे. नाट्यगृहात ५० टक्के उपस्थितीला अनुमती आहे; मात्र प्रसिद्ध मान्यवरांना जेव्हा पुरस्कार देण्यात येतो, तेव्हा रसिकांची पुष्कळ गर्दी होती. त्यामुळे सोहळा रहित करावा लागत आहे. गतवर्षीही कोरोना संसर्ग आणि महापूर यांमुळे सोहळा होऊ शकला नाही. ५ नोव्हेंबरला भावे नाट्यमंदिरात केवळ नटराज पूजन होईल, अशी माहिती ‘अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’चे कार्यवाह विलास गुप्ते यांनी दिली.