पुणे, ८ ऑक्टोबर – गुन्हेगारी टोळीचा जम बसवण्यासाठी व्यावसायिकाकडे २ लाख रुपयांची खंडणी मागून तडजोडीअंती १ लाख रुपये घेणार्या एका सराईत गुन्हेगारासह तिघांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. हत्येच्या गुन्ह्यातून ८ वर्षांनी तात्पुरत्या जामिनावर कारागृहाबाहेर पडल्यानंतर आरोपीने हा गुन्हा केला. विशाल उपाख्य जंगल्या सातपुते, मंगेश सातपुते, अक्षय भालेराव अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२८ सप्टेंबर २०२१ पासून तक्रारदारांच्या भ्रमणभाषवर विशाल सातपुते याच्याकडून वेगवेगळ्या भ्रमणभाषचा वापर करून सतत दूरभाष करून २ लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती.