पुणे – मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्बंध लादले होते. त्यामुळे उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेने बंधने अल्प असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पूजेसंबंधी सेवांच्या मागणीत ७२ टक्क्यांनी वाढ झाली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये मंडप, गुरुजी, मिठाई दुकाने आणि फुले यांच्या मागणीत वाढ झाली. ‘जस्ट डायल’ने केलेल्या सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे.